राज्यातील 137 आयपीएस आणि अन्य अधिकार्‍यांच्या बदल्या

0

मुंबई : महाराष्ट्रातील 60 आयएएस अधिकार्‍यांच्या बदलीनंतर राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने भारतीय पोलीस सेवेसह (आयपीएस) राज्यातील 137 आयपीएस आणि अन्य अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. धडाडीचे पोलिस आयुक्त अशी ओळख निर्माण केलेले आयपीएस अधिकारी औरंगाबादचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची मुंबईत बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर यशस्वी यादव औरंगाबादला येणार आहेत. तर, औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी नागपूर येथील डॉ. आरती सिंह यांची नियुक्ती झाली आहे. अमरावती परिक्षेत्राचे महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांची बदली पुणे कारागृह विशेष महानिरीक्षक म्हणून करण्यात आली आहे.

पुणे विभातील बदल्या
पुणे शहर गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील यांच्यासह विविध विभागातील तब्बल दहा उपायुक्तांच्या बदल्या झाल्या असून तेवढेच अधिकारी पुण्याला देण्यात आले आहेत. रिक्त असलेल्या गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्रदीप देशपांडे आणि दक्षिण विभागाच्या अतिरिक्त आयुक्तपदी सोलापूरचे आयुक्त आर. पी. सेनगावकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर सीआयडीचे उपमहानिरीक्षक अब्दुल रहेमान यांची बिनतारी संदेश विभागात बदली करण्यात आली आहे.

डॉ. बसवराज तेली (परकीय नागरिक नोंदणी, पुणे ते अधीक्षक हिंगोली), श्रीकांत पाठक ( विशेष शाखा ते मुंबई शहर), अरविंद चावरीया (मुख्यालय ते महामार्ग पुणे), पी. आर. पाटील (गुन्हे शाखा ते नाहसं नागपूर), कल्पना बारवकर (परिमंडल चार ते सीआयडी), रामनाथ पोकळे (सीआयडी ते अधीक्षक जालना), राजकुमार शिंदे ( अतिरिक्त अधीक्षक पुणे ग्रामीण ते फोर्स वन मुंबई), तानाजी चिखले (अतिरिक्त अधीक्षक , बारामती ते पोलीस प्रशिक्षण केंद्र , लातूर), अमोल तांबे ( महामार्ग पुणे ते महामार्ग मुंबई), शिरीष सरदेशपांडे (अधीक्षक, लाचलुचपत पुणे ते सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन), तेजस्विनी सातपुते ( सीआयडी ते अतिरिक्त अधीक्षक, पुणे ग्रामीण).

पुण्यात बदलून आलेले अधिकारी
ज्योतिप्रिया सिंह (अधीक्षक जालना), बी. जी. गायकर (अधीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नाशिक), अशोक मोराळे (अधीक्षक, हिंगोली), संजय बाविस्कर (अधीक्षक, बुलढाणा), डॉ. संदीप पखाले (अतिरिक्त अधीक्षक, गोंदिया).

नाशिक जिल्ह्यातील बदल्या
पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक पदी आयपीएस संजय दराडे यांची नियुक्ती झाली आहे. पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे यांची बदली झाली आहे. मालेगाव अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची पदोन्नतीवर उपयुक्त नागपूर येथे बदली झाली. मालेगाव अपर पोलीस अधीक्षक पदी आयपीएस हर्ष पोद्दार यांची नियुक्ती झाली आहे. पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, पोलिस उपायुक्त विजय पाटील, पोलिस उपयुक्त दत्ता कराळे यांची बदली झाली आहे. माधुरी कांगने व श्रीकृष्ण कोकाटे हे नाशिक मधील नवे पोलिस उपायुक्त झाले आहेत.