राज्यातील 37 हजार वैद्यकीय संस्थांची तपासणी

0

पुणे । सांगलीतील म्हैसाळ प्रकरणानंतर राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाने राज्यभरामध्ये राबविलेल्या मोहिमेंतर्गत 37 हजार 68 वैद्यकीय संस्थांची तपासणी केली आहे. त्यापैकी 6 हजार 742 संस्थांनी विविध निकष पाळले नसल्याचे समोर आले आहे. यापैकी 2 हजार 84 वैद्यकीय संस्थांनी जैव वैद्यकीय कचर्‍यासाठीचे असणारे (बायोमेडिकल वेस्ट) नियम पाळले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्याखालोखाल बॉँम्बे नर्सिंग अ‍ॅक्टचे नियम, अग्निशमन यंत्रणा नसणे, क्रॉसपॅथी आदींचे नियम पाळले नसल्याचे दिसून आले आहे.

या मोहिमेत रुग्णालयांची नोंदणी, डॉक्टरांची पदवी आणि त्यास अनुसरून संबंधित परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र, डॉक्टरांची गुणवत्ता, बायोमेडिकल वेस्ट संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र, क्रॉसपॅथी, अन्न औषध विभागाचा मेडिकल परवाना आदी प्रकारचे 16 प्रकारचे निकष तपासण्यात आले. 2 हजार 84 संस्थांमध्ये जैववैद्यकीय कचर्‍यासाठी आवश्यक असणारी नोंद नसल्याचे आढळून आले. त्या खालोखाल 1 हजार 329 वैद्यकीय संस्थांनी ‘बॉॅॅम्बे नर्सिंग होम रजिस्स्ट्रेशन अ‍ॅक्ट’ (बीएनए) ची नोंदणी न केल्याचे आढळून आले आहे. तर 739 संस्थांना बीएनए आणि एमपीसीबी कायद्याचे उल्लंघन, 536 रुग्णालयांकडून रेकॉर्ड अपूर्ण भरण्यात आले आहे. 410 वैद्यकीय संस्थांकडून क्रॉसपॅथी, शैक्षणिक पात्रता नसताना काम करणारे कर्मचारी 98, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंद नसलेले डॉक्टर 76, बोगस डॉक्टर 68, 56 संस्थांनी गर्भलिंग निदान कायद्याचे उल्लंघन, 43 संस्थांनी गर्भधारणा कायद्याचे उल्लंघन केल्याचे आढळून आले.