खान्देशातील 113 ग्रामपंचायतींचा समावेश
भुसावळ: जानेवारी ते फेबु्रवारी 2018 दरम्यान मुदत संपणार्या राज्यातील 734 ग्रामपंचायतींचानिवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव री.वि.फणसेकर यांनी जाहीर केला आहे. खान्देशातील 113 ग्रामपंचायतींचा त्यात समावेश आहे.
या जिल्ह्यांमध्ये होणार निवडणुका
कोकण विभागातील एकूण 107 ग्रामपंचायतीसाठी निवडणुका होतील. त्यात ठाणे (31), पालघर (39), रायगड (11), रत्नागिरी (10), सिंधूदुर्ग (16), नाशिक विभागातील 182 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतील. त्यात नाशिक (2), जळगाव (100), नंदुरबार (13), अहमदनगर (67), पुणे विभागात 199 ग्रा.पं.साठी निवडणुका होतील. त्यात पुणे (99), सोलापूर (64), सातारा (19), सांगली (5), कोल्हापूर (12), औरंगाबाद विभागातील 176 ग्रा.पं.साठी निवडणुका होतील. त्यात औरंगाबाद (2), बीड (162), नांदेड (4), परभणी (2), उस्मानाबाद (1), लातूर (5), अमरावती विभागात 61 ग्रा.पं.साठी निवडणूक होईल. त्यात अमरावती (13), अकोला (3), वाशिम (2), बुलढाणा (43), नागपूर विभागात आठ ग्रा.पं.साठी निवडणूक होईल. त्यात वर्धा (3), गोंदिया (2), गडचिरोली (4) अशा एकूण 734 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 26 डिसेंबर 2017 रोजी सर्वच ठिकाणी निवडणुका होणार आहेत.