मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजपासून संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आल्याची घोषणा केली आहे. सुरुवातीला लॉकडाऊन करण्यात आले होते, मात्र तरीही गर्दी होतच असल्याचे शेवटी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली आहे. जिल्ह्याच्या सीमा देखील बंद करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही.
प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली आहे. टॅक्सी आणि रिक्षा चालू असणार आहे. मात्र टॅक्सीत दोन आणि रिक्षात एकच प्रवाशी घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत राहणार आहे.
घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही असा दिलासा देखील मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.