मुंबई :- महाराष्ट्रात आजही काही ठिकाणी पावसाचा शिडकाव होणार आहे. केंद्रीय हवामान खात्याने हा अंदाज व्यक्त केला आहे. मागील तीन दिवस राज्यातील काही भागात पाऊस पडत आहे.
आज मात्र पावसाचा प्रभाव कमी असण्याची शक्यता आहे. रविवारी पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या जोरदार पावसाने वातावरणात थोडा गारवा निर्माण केला. सोमवारी विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.