मुंबई: जगात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. संख्या दिवसागणिक वाढतच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार आवश्यक सर्व उपाययोजना करत आहे, मात्र त्याला अपेक्षित यश येत नाहीये. देशात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत असतांना महाराष्ट्रात कोरोनाच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आज तब्बल 67 रुग्ण नव्याने पॉझिटिव्ह आढळले असल्याने आता महाराष्ट्रातील कोरोनाचा आकडा 490 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 26 जणांचा यात बळी गेला असून 50 जण बरे होऊन घरी गेले आहे.
दिल्लीतील निजामुद्दीन मर्कझ येथील कार्यक्रमाला महाराष्ट्रातील तब्बल 1400 जण होते, त्यातील 1300 जणांना शोधून त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. तबलिंगीमुळे देशात कोरोनाची साडेसहाशे पेक्षा अधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे. संपूर्ण देशाला तबलिंगी धोका निर्माण झाले आहे.