मुंबई: राज्यातील चर्मकार समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी लवकरच राज्यात चर्मकार आयोग स्थापन करण्यात येईल, अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
रोहिदास समाज पंचायत समाज संघाच्या वतीने परळ येथे उभारण्यात येत असलेल्या संत रोहिदास भवन भूमिपूजन आणि कोनशीलेचे उद्घाटन मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. यावेळी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, आमदार भाई गिरकर, अजय चौधरी, मंगेश कुडाळकर यांच्यासह माजी महापौर महादेव देवळे स्नेहल आंबेकर आदी उपस्थित होते.