राज्यात तृतीयपंथीय मतदारांचा टक्का वाढला

0

मुंबई । राज्यात ट्रान्सजेंडर (तृतीयपंथी) मतदारांचा टक्का वाढल्याचे पुढे आले आहे. हे ट्रान्सजेंडर पूर्वीपासूनच होते की मतदार यादीत त्यांचा समावेश झाल्यामुळे नेमका आकडा पुढे आला याबाबत निश्चिती नाही. मात्र, प्राप्त माहितीनुसार राज्यात ट्रान्सजेंटरची संख्या तब्बल दुपटीने वाढल्याचे पुढे आले आहे. आता राजकीय, सामाजिक क्षेत्रांमध्ये तृतीयपंथी महत्वाची भूमिका निभावत असून आता त्यांचा मतदारही वाढत आहे.

वेल्फेअर बोर्ड स्थापन करा
दरम्यान, राज्यात ट्रान्सजेंर्सची संख्या आणखीही वाढणार आहे. त्यामुळे ट्रान्सजेंडर्सचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने वेल्फेअर बोर्डाची स्थापना करायला हवी. एकदा का बोर्डाची स्थापना झाली की, त्यानंतर ट्रान्सजेंडर्सचा अचूक आकडा पुढे येऊ शकेल. त्याचा परिणाम ट्रान्सजेंडर मतदारांच्या संख्येत आणखी वाढ होईल, असे ट्रान्सजेंडर्सचे म्हणे आहे.

राज्यात एकून 1701 मतदार
2014 च्या मतदार यादीत हीच संख्या 918 इतकी होती. त्यापैकी विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावलेल्या ट्रान्सजेंटर्सची संख्या 972 इतकी होती. एकूण आकडेवारीवर नजर टाकता 2015 मध्ये ही संख्या 1038 इतकी होती. हीच संख्या 2017 मध्ये वाढली असून, 1701 इतकी झाली आहे. प्राप्त माहितीनुसार राज्यात एकूण 1701 इतके मतदार आहेत. मुंबईत ही संख्या तब्बल 415 इतकी आहे.