नागपूर: देशात नागरिकत्व कायदा वरून मोठे रनकंदन सुरु आहे. देशातील पूर्वोत्तर राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचार उसळला आहे. अनेक राज्यांनी हे विधेयक लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचीही या कायद्यासंदर्भात संदिग्ध भूमिका आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या कायद्यासंदर्भात न्यायालयाच्या निर्णयानंतर विचार करू, असे सूतोवाच केले आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी याविषयी लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्राचीही या कायद्यासंदर्भात संदिग्ध भूमिका आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या कायद्यासंदर्भात न्यायालयाच्या निर्णयानंतर विचार करू, असे सूतोवाच केले आहेत. त्यानंतर आता हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. राज्यात हा कायदा लागू होतो, की नाही उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्य सरकारला यासंदर्भात असलेल्या अधिकारांसंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी नागपूर दौऱ्यानिमित्त दरम्यान चर्चा केली जाणार आहे. तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत हेसुद्धा नागपुरातच आहेत, त्यामुळे यासंदर्भात निर्णय बैठकीनंतर घेतला जाईल, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सकाळी विधान भवन परिसरात आयोजित बैठकीत म्हटले आहे.