राज्यात परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम !

0

मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिकच वाढत आहे. त्यामुळे मोठी चिंताजनक परिस्थिती आहे. अशातच युजीसीने परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहे. मात्र महाराष्ट्र सरकार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे तसे संकेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) सुधारित नियमांनुसार विद्यापीठ व उच्च शिक्षण संस्थांनी सप्टेंबर अखरेपर्यंत परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र कोणत्याही प्रकारची नियमावली देण्यात आलेली नसल्याने परीक्षा घेणार कशी हा प्रश्न निर्माण झाले असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले आहे.