पार, तापी आणि नर्मदा बोगद्याद्वारे जोडणार
मुंबई । राज्यतील शेतकरी आत्महत्या आणि दुष्काळाच्या चक्रात सापडलेला शेतकरी या वरून सरकार कायमचा उपाय करणार आहे. या साठी अटलजींच्या स्वप्न प्रकल्प मानल्या जाणार्या नदीजोड प्रकल्पाची सुरवात महाराष्ट्रातून होणार आहे. या प्रकल्पच्या सुरवाती साठी पहिली बैठक गुरुवारी मुख्य मंत्र्यांच्या निवास्थानी वर्षा वर होणार आहे.
11 हजार कोटींचा निधी मिळणार
राज्यात शेतकरी आत्महत्या, वर्षानुवर्ष दुष्काळात सापडलेला शेतकरी यासाठी कायमचा उपाय म्हणून राज्यत नदीजोड प्रकल्पाची सुरवात होणार आहे. या प्रकल्पासाठी पहिली बैठक गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे होणार आहे. या बैठकीत केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार असून जलसंधारण विभागाचे केन्द्रीय सचिव, राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, तसेच जलसंपदा विभागाचे सचिव उपस्थित राहणार आहेत. या प्रकल्पासाठी केंद्राकडून 11 हजार कोटींचा निधी उपलब्ध होणार असून या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पार, तापी आणि नर्मदा या नद्यांना बोगद्याच्या माध्यमातून जोडले जाणार आहे .
बाजपेयींच्या काळात मिळाली मान्यता
अटलबिहारी बाजपेयी यांच्या काळात या प्रकल्पाला केंद्राने मान्यता दिली होती. मात्र नंतर काँग्रेस सरकारने याकडे दुर्लक्ष केले. राज्यात 80 टक्के पाऊस हा धारण कमी असणार्या क्षेत्रात असल्याचे अनेक संशोधनातून स्प्ष्ट झाले आहे. असे असतांना शेतकरी स्वावलंबी व्हावा म्हणून सरकारने अनेक उपाय योजना केल्या मात्र सिंचन क्षमता आणि पायची साठवणूक क्षमता यात फरक आणि हवामानात होणारे बदल या मुळे शेतकरी नेहमीच दुष्काळात सापडत राहिला आहे. त्यामुळे हा प्रकल्प शेतकर्यांच्या दृष्टीने मह्तवपूर्ण ठरणार आहे.