राज्यात पावसाची शक्यता !

0

मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील वातावरणात बदल झाले आहे. थंडी सुरु असतानाच अचानक आभाळ आले असल्याने पुन्हा हवामान दमट झाले आहे. दरम्यान महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेन यासंबंधी अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रात ढगाळ वातावरणदेखील राहील. तसंच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तसेच स्थानिक वातावरण यामुळे ढगाळ वातावरण राहील असे कुलाबा वेधशाळेने म्हटले आहे.