मुंबई: मागील दोन आठवड्यापूर्वी राज्यात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातले होते. त्यानंतर पावसाने थोडीशी विश्रांती घेतली होती. दरम्यान आता पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाले आहे. त्यामुळे अनेक शहरांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. काल मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्याला झोडपणाऱ्या पावसानं रात्रीपासून पश्चिम महाराष्ट्र, कोकण व विदर्भाला झोडपून काढले आहे. गडचिरोलीत १०० गावांचा संपर्क तुटला आहे. तर, कोकण व पुण्यात धरण क्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.