राज्यात बुधवारी गारपिटीची शक्यता

0

पुणे : दक्षिणपूर्व अरबी समुद्रात केरळ ते महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने येत्या बुधवारी उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली असून कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे.

राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला येथे 39.5 अंश सेल्सिअस तर, सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे 15.3 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. गेल्या महिन्यात 11 ते 14 फेब्रुवारीदरम्यान मराठवाडा, विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड परिसरात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली होती़