राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक? राष्ट्रपती राजवटीकडे वाटचाल

मुंबई : राज्यातील घडामोडी अधिक गतिमान झाल्या असून हे सरकार टिकेल की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. सध्याच्या घडीला हे सरकार विश्वासदर्शक ठराव जिंकेल का? हा महत्वाचा विषय आहे. जिंकला तरी हे सूत किती दिवस टिकेल ? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. असे झाल्यास लवकरच राष्ट्रपती राजवट लागून विधानसभेची निवडणूक लागल्यास आश्चर्य वाटू नये.

बंडखोर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाची संधी
शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या गटाने भाजप सोबत जाऊन सत्ता स्थापन केली. भाजपचा मुख्यमंत्री आणि बंडखोर गटाचा उपमुख्यमंत्री असे गणित असताना भाजपने बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीला पसंती दिली. या घेतनेनंतर देवेंद्र फडणवीस यांना मानणारा मोठा गट नाराज झाला आहे. दुसरीकडे बहुमत चाचणी दोन दिवसात घ्यावी असे आदेश राज्यपाल यांनी दिले. असे असताना अधिवेशन एक दिवस पुढे ढकलण्यात आले आहे. भाजपातील नाराज गट एकनाथ शिंदे यांना मतदान करेल का? तसाच शिंदे गतातही शिवसेनेत परत जाऊ इच्छित असणारे एकनाथ शिंदे यांना मतदान करतील का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

तत्काळ आदेशामुळे घ्यावी लागली शपथ
भाजपा वरीष्ठ नेत्यांनी उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असतील हा निर्णय दोन दिवसापूर्वी घेतला होता. तो जाहीर करताना देवेंद्र फडणवीस यांनी थेट सरकार बाहेर राहू, असे जाहीर केलं. त्यावर दिल्ली भाजप अध्यक्ष यांच्यासह प्रतिक्रिया उमटली. तत्काळ आदेश आल्याने देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली. ही देवेंद्र फडणवीस यांना रोखण्याची रणनीती असेल तर भाजप मंत्रीमंडळाची यादीही दिल्लीतून तयार करेल. यात देवेंद्र फडणवीस यांना मानणारे किती जणांचा समावेश केला जाईल हा प्रश्न आहे. मात्र पंकजा मुंडे यांच्यासारख्या नाराज नेत्यांना अथवा देवेंद्र फडणवीस विरोधी गटाच्या या नेत्यांना भाजप श्रेष्ठी मंत्री मंडळात स्थान देतील हे नक्की आहे. हे मंत्रीमंडळ देवेंद्र फडणीवस यांच्या एकहाती चालणार नाही याची काळजी दिल्लीकर घेतील हे ही तेवढेच खरे.

न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले लक्ष
उद्धव ठाकरे सरकार पडल्यानंतर कुणीही जल्लोष करू नये, अशी भूमिका शिवसेनेच्या फुटीर नेत्यांनी घेतली होती तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांची राजकीय उंची कमी करण्याचा प्रयत्न झाला. ही भाजपच्या एका गटाची भूमिका असताना भाजपने आता जल्लोषाची तयारी सुरू केली आहे. सत्ता येऊनही कालपर्यंत स्मशान शांतता राखणार्‍या भाजपात पक्ष श्रेष्ठत्वच्या आदेशाने जल्लोष आयोजन केले का हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय. जरी एकनाथ शिंदे यांच्या गटाने बहुमतसाठी आकडा पार केला तरी सर्वोच्च न्यायालयात बंडखोर आमदार यांच्या गटाचा मुद्दा कायम राहणार आहे. सर्वोच न्यायालय जो निर्णय देईल तो यापुढे देशात लागू होईल हे पाहता या ठिकाणी सर्वोच्च नायालय काय निर्णय देते ? याकडे सर्वच लक्ष लागून आहे. या सर्व घडामोडी पाहता राज्यात असे अस्थिर सरकार किती काळ चालेल ? हा मोठा प्रश्न आहे. बहुमत सिद्ध करताना या सरकारला बहुमत गमवावे लागले तर आश्चर्य वाटायला नको.