राज्यात शेतकरी हिताचे निर्णय घेतले म्हणून मंत्रीमंडळातून बाहेर

0

माजी मंत्री एकनाथराव खडसे पुन्हा गरजले

रावेर : राज्यात शेतकरी हिताचे धाडसी निर्णय घेतले म्हणून मंत्री मंडळाबाहेर असून शेतकर्‍यांवर जेव्हा-जेव्हा नैसर्गिक आपत्ती आली तेव्हा कृषी मंत्री असतांना त्यांच्या पाठीशी होतो, असे स्पष्ट मत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे व्यक्त केले. रावेर येथे एका खाजगी कंपनीच्या उद्घाटन कार्यक्रमास आल्यानंतर ते बोलत होते.

माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, नगराध्यक्ष दारा मोहम्मद, जिल्हा परीषद सदस्य विनोद तराळ, भैय्यासाहेब पाटील, श्रमसाधना कंपनीचे सर्वेसर्वा रमेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती नीळकंठ चौधरी, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, योगेश पाटील, किशोर पाटील, हेमराज पाटील, कोलते, प्रल्हाद पाटील (मोरगावकर) आदी उपस्थित होते.