भाजपाने पळवून नेलेली मुले पुन्हा परतीच्या मार्गावर-सुनील महाजन
जळगाव- केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे 2018 मध्ये झालेल्या मनपा निवडणुकीत जनतेने भाजपला कौल दिला. सत्ता असतानाही मनपातील सत्ताधारी आणि शहराचे आमदार गेल्या 14 महिन्यात अपयशी ठरले आहे. तसेच राज्यात भाजपची सत्ता गेल्यामुळे मनपातील नगरसेवकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिवसेना फोडाफोडीचे राजकारण करणार नाही.मात्र मनपा निवडणुकीत भाजपने पळवून नेलेली मुले परतीच्या मार्गावर असल्याचा दावा मनपा विरोधी पक्ष नेते सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेत केला.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉग्रेस एकत्र येवून महाविकास आघाडीने सत्ता स्थापन करुन भाजपला सत्तेपासून लांब केले आहे.त्यामुळे मनपातील नगरसेवकांमध्ये स्वस्थता निर्माण झाली आहे. राज्यात बदल झाल्यामुळे मनपात देखील बदलाचे संकेत असल्याची सोशलमीडियावर चर्चा आहे.शिवसेना कधीही फोडाफोडीचे राजकारण करणार नाही.मात्र आगामी काळात योग्य निर्णय निर्णय घेण्यात येईल असे सुचक विधान सुनील महाजन यांनी यांनी केले.
राज्यात व केंद्रात सत्ता होती.केंद्रात सत्ता जरी असली तरी आता राज्यातील भाजपची सत्ता गेली आहे. शहराच्या आमदारांनी गेल्या पाच वर्षात शहरासाठी कोणताही ठोस निधी आणता आलेला नाही. 25 कोटींचा निधी देखिल तीन वर्षात खर्च करता आलेला नाही. त्यामुळे शिल्लक निधी परत जाण्याची शक्यता आहे. विकासाची कामेच होत नसल्याने नागरीक नगरसेवकांना जाब विचारत आहेत. नेत्यांनी केवळ आश्वासने दिली.मात्र विकासकामे करण्यास अपयशी ठरल्याचा टोली सुनील महाजन आणि बंटी जोशी यांनी लागावला.पत्रकार परिषदेस शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे,गणेश सोनवणे,मानसिंग सोनवणे उपस्थित होते.