ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
हे देखील वाचा
नागपूर : राज्यात सर्वत्र मागणीनुसार वीज पुरवठा करण्यात येत असून, सध्या 14 हजार 400 मेगाव्हॅटची मागणी आहे. तेवढा वीजपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
यावेळी ऊर्जामंत्री म्हणाले, काही ठिकाणी कमी दाबाचा पुरवठाही होत आहे. त्यासाठी मागणीनुसार वीज निर्मिती करण्यात येते. पोहरा पुर्णा, ता. भातुकली, जि. अमरावती येथे होत असलेल्या सिंगल फेज विद्युत पुरवठ्याबद्दल सदस्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रश्न विचारला होता. त्यानुसार विद्युत विभाग करीत असलेल्या कारवाई बद्दल महावितरण कंपनीकडून पोहरा पुर्णा या गावामध्ये नवीन लघुदाब वीज वाहिनेचे 5 पोलचे काम व 10 स्पॅनचे (1 फेज 3 वायर ते 3 फेज 5 वायर) चे काम देखभाल व दुरुस्ती या योजनेंतर्गत पूर्ण करण्यात आले असून वाहिनी दि. 12 जून 2018 रोजी कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे त्याठिकाणची कमी दाबाच्या विजेची समस्या दूर झाली आहे. असे त्यांनी सांगितले.