राज्यात सर्वत्र स्वाइन फ्लूचे थैमान

0

मुंबई – राज्यात स्वाइन फ्लूच्या आजाराने थैमान घातले असतानाच आतापर्यंत रुग्णांच्या बळीचा आकडा 114 वर पोहचला आहे. दररोज रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढत आहेत. आज नागपूरमध्ये 3, बुलढाणा, अमरावती, अहमदनगर आणि अकोला येथे प्रत्येकी 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे राज्यात स्वाइन फ्लूने थैमान घातल्याचे वृत्त सर्वप्रथम दै. जनशक्तिने दिले होते. त्यानंतर यासंदर्भात आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शनिवारी आरोग्य भवन येथे आढावा बैठक घेतली. प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेऊन रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी एक्शन प्लॅनही तयार केला.

स्वाइन फ्लूचा ताप राज्यात वाढत चालला आहे. नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर, नागपूर,अमरावती,कोल्हापूर, सोलापूर परभणी लातूर बुलढाणा अकोला उस्मानाबाद, धुळे सांगली जालना हिंगोली बीड आणि ठाणे या परिसरात स्वाईन फ्लूचे बळी गेले आहेत. त्याच पार्श्‍वभूमीवर आरोग्य मंत्र्यांनी आरोग्यभवन येथे बैठक घेऊन स्वाइन फ्लूच्या आजाराचा आढावा घेतला व आरोग्य विभागाला काही सूचना केल्या. 1 जानेवारी ते 14 एप्रिल पर्यंत 10008 रुग्नाची दैनंदिन तपासणी करण्यात येते. स्वाइन फ्लू ला आळा घालण्यासाठी राज्यातील शासकीय रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहे. 204 वॉर्डात 1253 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच 2199 स्किनिंग सेंटर, 512 व्हटीलेटर, 96 अतिदक्षता विभाग सुरु करण्यात आले आहेत. तसेच 4 प्रयोग शाळा सुरु करण्यात आल्या असून, 17 खाजगी प्रयोग शाळांना मान्यता देण्यात आली आहे. तसेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सर्वेक्षण आणि जनजागृती सुरु असून खाजगी रुग्णालयांनाहि आदेश देण्यात आले आहेत. इन्फ्लुएंझा ए एच 1 एन 1 प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सज्ज असून राज्यात या आजारावरील ऑसेलटॅमीवीर औषधे पुरेश्या प्रमाणात आहेत. तसेच राज्यातील सर्व उपजिल्हा तसेच जिल्हा रुग्णालायात इन्फ्लुएंझा ए एच 1 एन 1 च्या उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. आल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात

हवामानात बदलामुळे मृत्यू वाढले
स्वाइन फ्लूचे विषाणू एच 1 एन 1 यांच्या गुणसूत्रांमध्ये झालेला बदल आणि हवामानातील बदल यामुळे हे मृत्यू वाढले आहेत तसेच फेब्रुवारीमध्ये आणि मार्चमध्ये स्वाइन फ्लूने सर्वाधिक मृत्यू झाले असून, या काळात झालेला हवामान बदल याला कारणीभूत आहे. या दोन महिन्यांत रात्रीच्या वेळेस 13 अंश सेल्सिअस, तर दिवसा 30 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत वाढणारे तापमान यामुळे ही मृत्यूचे प्रमाण वाढले आहे असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

काय लक्षणे आहेत?
स्वाइन फ्लूची लक्षणे ही सर्व साधारण तापासारखीच असतात. यात थंडी, ताप 100 अंश फॅ. पेक्षा जास्त सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब व कधी कधी पोटदुखी इत्यादी लक्षणांचा समावेश असतो. सध्या जुलाबाची साथ अधिक प्रमाणात आहे असे आरोग्य विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले

जिल्हा/ मनपा मृत्यूची संख्या

नाशिक 20
पुणे मनपा 14
पिपरी चिंचवड 11
अहमदनगर 10
औरंगाबाद 9
पुणे ग्रामीण 9
नागपूर 7
अमरावती 6
कोल्हापूर 7
सातारा 7
सोलापूर 3
परभणी 2
लातूर 2
बुलढाणा 2
अकोला 2
उस्मानाबाद 1
धुळे 1
सांगली 1
जालना 1
ठाणे 1
हिंगोली 1
बीड 1
इतर राज्य (कर्नाटक 1, मध्यप्रदेश 1 )