मुंबई : राज्यभरात राबवण्यात येत असलेल्या गोवर – रुबेला लसीकरण माहिमेत गेल्या २८ दिवसांत २ कोटी १० लाख बालकांना लस देण्यात आली आहे. लसीकरणाचे जवळपास ६० टक्क्यांहून अधिक उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. ज्या बालकांना लसीकरण झाले नाही, त्यांच्यासाठी सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.
९४ हजार शाळांमध्ये लसीकरण मोहिम सुरु
२७ नोव्हेंबरपासून लसीकरणाच्या मोहिमेला सुरूवात झाली आहे. दररोज सुमारे १० लाख बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ते पुर्ण करण्यासाठी आरोग्ययंत्रणा प्रयत्न करत आहे. सध्या ही मोहीम राज्यातील सुमारे ९४ हजार शाळांमधून सुरु आहे. मोहिमेला सुरुवात होऊन एक महिना पुर्ण झाला आहे. त्यात जवळपास २ कोटी १० लाख बालकांना लसीकरण करण्यात यंत्रणेला यश आले आहे.