सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांची माहिती
मुंबई:- राज्यातील 1 लाख 20 हजार शेतकऱ्यांची 14 लाख 33 हजार क्विंटल तूर राज्य सरकारने हमीभावाने खरेदी केली आहे. तर 4 हजार शेतकऱ्याची 55 हजार क्विंटल हरभरा हमीभावाने खरेदी केला असल्याची माहिती पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी जनशक्तिशी बोलताना दिली आहे.
राज्यात १ फेब्रुवारीपासून आधारभूत दराने तूर खरेदीला सुरुवात झाली आहे. आजपर्यंत १६७ तूर केंद्रावर एक लाख २० हजार ३०९ शेतकऱ्यांची १४ लाख 33 हजार ३०९ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. यावर्षी हरभरा ची देखील हमीभावाने खरेदी केली जात आहे. आज अखेर राज्यातील १६३ खरेदी केंद्रावर ३ हजार ८५२ शेतकरी यांची ५५ हजार १५२ क्विंटल हरभरा हमीभावाने खरेदी करण्यात आला आहे.
तूर खरेदीचा काळ तीन महिने असून आतापर्यंत ४ लाख ३ हजार ३७६ शेतकऱ्यांनी तूर खरेदीसाठी नोंदणी केली आहे. सध्या कार्यरत खरेदी केंद्रांशिवायही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार व जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारसीनुसार केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत, असेही पणन मंत्री देशमुख यांनी सांगितले.
आज अखेर स्थिती
तूर
एकूण केंद्र – 167
खरेदी वजन -1433309
शेतकरी संख्या – 118947
हरभरा
एकूण केंद्र -163
खरेदी वजन – 55152
शेतकरी संख्या – 3852