राज्याला कर्जबाजारी करून भाजपने पळ काढला

0

पुणे – महाराष्ट्राला कर्जबाजारी करुन भाजप सरकारने सत्तेतून पळ काढला अशी प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिली आहे.

भाजपने पाच वर्षात दुप्पट कर्ज केले. महसूलाच्या उत्पन्नातील तूट वाढवली, राज्यातील पूरग्रस्तांना जाहीर केलेली मदत देण्यातही भाजपच्या राज्य सरकारला अपयश आले. परतीच्या पावसामुळे पीडित झालेल्या शेतकऱ्यांना दहा हजार कोटी रुपयांची मदत देऊन धीर देण्याऐवजी जनादेश असतानाही पळ काढला. असे तिवारी यांनी पत्रकात म्हटले आहे.

महायुतीतील मित्रपक्षाबरोबरची विश्वासार्हता जोपासण्याची जबाबदारी नेतृत्व करणाऱ्या भाजपची होती ती जबाबदारी निभावण्यात भाजप अपयशी ठरले अशी टीका तिवारी यांनी केली आहे.