राज्यासह देशात भाजपा सरकार ; भाजपा नगराध्यक्षच करू शकतो मुक्ताईनगराचा विकास

0

माजी मंत्री एकनाथराव खडसे ; प्रचाराचा नारळ वाढवला ; रस्त्यांसाठी आणले 89 कोटी

मुक्ताईनगर- राज्यासह देशात भाजपाचे सरकार असल्याने विकासकामांसाठी निधी केवळ भाजपा नगराध्यक्षच आणू शकतो, असे सांगत शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी 19 तर शहरालगतच्या रस्त्यांसाठी 70 कोटी असा एकूण 89 कोटींचा निधी आणल्याची माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे दिली. नगरपंचायत निवडणुकीतील भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नजमा तडवी आणि 17 प्रभागातील उमेदवारांच्या प्रचाराचा आदिशक्ती मुक्ताई, संत गजानन महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून शुभारंभप्रसंगी खडसे बोलत होते.

यांची होती उपस्थिती
खासदार रक्षा खडसे, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानचे संयोजक डॉ.राजेंद्रजी फडके, अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान, आमीर साहेब, जिल्हा परीषदेचे अशोक कांडेलकर, भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस सुनील नेवे, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विलास धायडे, डॉ.मनिषजी खेवलकर, योगेश कोलते, पंचायत समिती सभापती शुभांगी भोलाने, भुसावळ नगराध्यक्ष रमण भोळे, सावदा नगराध्यक्ष अनिता येवले, जिल्हा परीषद सदस्य जयपाल बोदडे, जिल्हा परीषद सदस्य निलेश पाटील, जिल्हा परीषद सदस्या वैशाली तायडे, जिल्हा परीषद सदस्या वनिता गवळे, पंचायत समिती उपसभापती प्रल्हाद जंगले, पंचायत समिती विकास पाटील, पंचायत समिती सदस्य राजूभाऊ सवळे, पंचायत समिती सदस्य सुवर्णा साळुंखे, पंचायत समिती सदस्य विद्या पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, शहराध्यक्ष मनोज तळेले तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.