जळगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाने नियमांचा भंग करणाऱ्या जळगाव शहरासह जिल्ह्यात २२ दारू दुकानांवर कारवाई केली अाहे. त्यात ११ परवानाधारकांना दंड भरण्याचे आदेश दिले असून, ९ परवानाधारकांना नोटीस बजावली आहे, अशी माहिती दीपककुमार गुप्ता यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान आपण राज्य उत्पादन शुल्क आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केल्याचा दावाही गुप्तांनी केला.
पाचोरा येथील देशी दारू दुकान परवानाधारक यादगीर कलाल (४५ हजार), हॉटेल मयूरीचे परवानाधारक चंद्रकांत देशमुख (३० हजार), प्रिन्स वाइन जळगावचे परवानधारक मधुकर चौधरी (३० हजार), भुसावळ येथील देशी दारू दुकानाचे परवानाधारक एन.एच. बसंतानी व भागीदार (३५ हजार), धानोरा येथील मोनसा बिअर व वाइन शॉपचे परवानाधारक पंकज महाजन (१० हजार), पारस बिअर व वाइन शॉपचे परवानाधारक शैलेंद्र महाजन (१० हजार), जामनेर येथील वरुण बिअर शॉपीचे परवानाधारक कृष्णा कलाल (१० हजार), जामनेर येथील प्रगती बिअर शॉपचे परवानाधारक ईश्वर चौधरी (१० हजार), जामनेर येथील बिअर व वाइन शॉपचे परवानाधारक लखनसिंग बुंदेल (१० हजार) व यावल येथील संगम बिअर शॉपचे संदीप सोनवणे यांना (३५ हजार रुपये) दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. मेहरूण येथील विठ्ठल नारायण वंजारी या परवानाधारकाने २५ हजार दंड भरला आहे. तर नीलम वाइनला करण्यात आलेला ४० हजार रुपये दंडही भरण्यात आलेला असल्याची माहिती गुप्ता यांनी दिली.
यांना दिली नोटीस : उमाकांत कोल्हे (उमेश वाइन, जळगाव) व भागीदार (जळगाव), नानक वाधवाणी (भुसावळ), संजय छाडेकर (पाळधी), संदीप बसंतानी नंदकिशोर पाटील (मारवड), सी. बी. जैसवाल (धानोरा), दलबीर सिंग ग्रोवर (जळगाव), एन. एच. वाधवाणी व व्ही. पी. भांडारकर (अमळनेर) या दारू परवानाधारकांना नोटीस बजावली आहे.