शिरूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे अवैध दारू व अमलीपदार्थांवर कारवाई करण्याची जबाबदारी आहे. त्याच अधिकार्याच्या अर्थपूर्ण संबंधामुळे लोकशाही पायदळी तुडवली जात आहे. अशा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक,उपअधीक्षक, दौंडचे राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक यांची तातडीने बदली करावी आणि खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणी क्रांतीवीर प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी माहिती सांगताना केली.
दारूबंदीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
शिरूर तालुक्यातील 93 ग्रामसभांनी दारूबंदीचे ठराव करूनदेखील व गेल्या अनेक दिवसांपासुन शिरूर तालुका संपुर्ण दारूबंदीसाठी आंदोलने करून मागणी केली आहे. मात्र त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने 1 मार्चपासुन क्रांतीवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी अभिनव पध्दतीने कपडे उतारो आंदोलन सुरू केले. दि.1 मार्च रोजी शासनाला नेहरू शर्ट अर्पण केलेला आहे. तर दि.8 रोजी पायजमा अर्पण करून सविनय कायदे भंगाचे आंदोलन सुरू ठेवले आहे.
तर दारूने अंघोळ करूण आंदोलन
यावेळी यशस्वीनीच्या नम्रताताई गवारी, वैशाली गायकवाड..अध्यक्ष मनस्वीनी, जिजाताई दुर्गे अध्यक्ष मराठा संघ शिरुर तालुका, डॉ. संतोष पोटे, बाजीराव कारखीले मेजर, अंकुश जाधव तंटामुक्ती अध्यक्ष निमोणे, भरत काळे, आशोक भुजबळ, रोहीदास काळे, देवेंद्र सासवडे उपाध्यक्ष ग्राहक पंचायत आदि उस्थित होते .यापूढेही कारवाईस टाळाटाळ केली तर 15 मार्चला तहसिलदारांच्या दालनात दारूने आंघोळ करणार असल्याचा इशारा पाचंगे यांनी दिला.