राज्य उत्पादन शुल्क विभागाची पनाखेड शिवारात धडक कारवाई

शिरपूर – मध्यप्रदेश निर्मित व विक्रीची व्हिस्की व बिअरची महाराष्ट्रात अवैध दारू वाहतूक करणाऱ्या महेंद्रा बोलेरो पिकअप वाहनावर तालुक्यातील पनाखेड शिवारात २५ डिसेंबर रोजी मध्यरात्री राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करीत ८लाख ७१ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करीत फरार चालक व मालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क,सीमा तपासणी नाका हाडाखेडचे निरीक्षक बापूसाहेब महाडीक यांना मिळलेल्या गोपनीय माहितीवरून करण्यात आली 

मध्यप्रदेशात निर्मित व विक्री असलेल्या दारूची अवैध रित्या महाराष्ट्र राज्यात वाहतूक होत असल्याची गोपनीय माहितीवरून तालुक्यातील पनाखेड-चोंदी रस्त्यावर २५ डिसेंबर रोजी मध्यरात्री साडे बारा वाजेच्या सुमारास पनाखेड शिवारात सापळा रचला संशयित वाहनावरील चालक पोलिसांना पाहून वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून अंधाराचा फायदा घेत पसार झाला.दरम्यान महिंद्रा बोलेरो पिकअप MH48-T- 4360 या संशयित वाहनास थांबवून तपासणी केली वाहनात ४ लाख ५० हजार रुपये किमतीची मध्यप्रदेश निर्मित व विक्री करीता असलेले विदेशी मद्य व बिअरचे एकूण ८५ बॉक्स मिळून आल्याने सदरचा मद्यसाठा व वाहन असे एकूण ८ लाख ७१ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी वाहन चालक आणि मालक यांच्या विरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्काचे आयुक्त कांतीलाल उमाप,राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई संचालक श्रीमती उषा वर्मा, नाशिक विभागीय उपआयुक्त अर्जुन ओहोळ,राज्य उत्पादन शुल्क धुळेच्या अधिक्षका श्रीमती सीमा झावरे यांचे मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क सीमा तपासणी नाका हाडाखेडचे निरीक्षक बापूसाहेब महाडीक ,दुय्यम निरीक्षक अतुल शिंदे,जवान एन.व्ही, ढगे, केतन जाधव,अमोल धनगर मनोज धुळेकर वाहन चालक रवींद्र देसले यांच्य पथकाने केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सीमा तपासणी नाका हाडाखेड हे करीत आहेत.