फैजपूरात संघर्ष यात्रेप्रसंगी मान्यवरांचा सूर : सर्वसामान्यांचा कणा मोडणार्या सरकारचाही मुडणार कणा
फैजपूर- घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवण्याची भाषा करणार्या मुख्यमंत्र्यांनी आधीच राज्य गहाण टाकले असून आता पुन्हा स्मारकासाठी कसे राज्य कसे गहाण टाकणार? असा प्रश्न उपस्थित करीत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. सर्वसामान्यांच्या कणा मोडणार्या भाजपा सरकारचा आगामी निवडणुकीत जनताच आता कणा मोडून त्यांना घरी पाठवेल, अशी टीका माजी मंत्रभ सुशील कुमार शिंदे, काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, विरोधी पक्ष नेते विखे पाटील आदींनी मनोगतात केली. वाढती महागाई, शेतकरी आत्महत्या, स्त्री अत्याचार यासह विविध मुद्यांवर टिका करीत काँग्रेस नेत्यांनी आगामी निवडणुकीसाठी रणशिंगही फुंकले. फैजपूरच्या पावण भूमित झालेल्या ऐतिहासीक अधिवेशनानंतर काँग्रेसने जनसंघर्ष यात्रेच्या दुसर्या टप्प्याला गुरूवारी येथून सुरुवात केली.
तीन तालुक्यांमध्ये संघर्ष यात्रेचे आगमन
फैजपूरातून संघर्ष यात्रेला सुरुवात झाल्यानंतर दुपारी फैजपूरात सभा झाल्यानंतर रॅली मुक्ताईनगरमार्गे बोदवडला रवाना झाली तर बोदवडच्या सभेनंतर रात्री उशिरा भुसावळ येथे बैठक झाली. मान्यवरांनी भाजपा सरकारवर येथेही आसूड ओढत आगामी निवडणुकीत भाजपाला चले जावचा इशारा देत काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन केले.