रावेर । भारतीय राज्य घटनेने माणसाला माणूसपण दिले, असे विचार साहित्यीक अ.फ.भालेराव यांनी येथे व्यक्त केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे व रावेर पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने संविधान जागर अभियानांतर्गत विशेष कार्यशाळा झाला. याप्रसंगी भालेराव यांनी ‘संविधानातील मुल्ये आणि शिक्षण व्यवस्था’ या विषयावर प्रकाशझोत टाकला. अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी विजय पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून बार्टी प्रकल्प अधिकारी प्रतिज्ञा दाभाडे, मुख्य मार्गदर्शक अ.फ.भालेराव सर (मुक्ताईनगर) व विस्तार अधिकारी नवाज तडवी उपस्थित होते.
या मान्यवरांनी केले मार्गदर्शन
समतादूत युनुस तडवी यांनी संविधान प्रास्ताविकेचे महत्व या विषयावर केले. उमेश दांडगे यांनी संविधान निर्मितीची पार्श्वभूमी या विषयावर मार्गदर्शन केले. सलीम तडवी यांनी संविधानाची ओळख व महत्व या विषयावर मार्गदर्शन केले. नवाज तडवी यांनी भारतीय संविधानातील कायदेप्रणाली व सामाजिक न्यायाविषयी मार्गदर्शन केले. प्रतिज्ञा दाभाडे यांनी संविधानातील हक्क आणि कर्तव्य या विषयावर मार्गदर्शन केले. प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन केल्यास देशातील गुन्हेगारी पुर्णत: नष्ट होण्यास मदत होईल असेही सांगितले.
यांनी घेतले परीश्रम
कार्यशाळेचे संपूर्ण आयोजनासाठी कॉस्ट्राईब संघटना अध्यक्ष उमेश दांडगे, उपाध्यक्ष साजीद तडवी, रावेर तालुका समतादूत सलीम तडवी आदींनी यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले. जळगाव समतादूत यश सुर्यवंशी, समतादूत चंद्रकांत, समतादूत शरद यांची तसेच तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन विजय गाढे यांनी तर आभार हारून जमादार यांनी मानले.