राज्य निबंध स्पर्धेत दीपाली भंगाळे तृतीय

0

भुसावळ । जीवन गौरव मासिकाअंतर्गत शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत तळवेल जिल्हा परीषद कन्या शाळेच्या शिक्षिका दीपाली भंगाळे यांनी जिल्ह्यातून तृतीय क्रमांक पटकावला. ‘ सोशल मीडीया व आजची तरुणपिढी’ या विषयावर त्यांनी निबंध सादर केला.

आगामी राज्यस्तरीय जीवनगौरव आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील 34 शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता. दीपाली भंगाळे या भुसावळच्या र.नं. मेहता प्राथमिक विद्यामंदिराचे शिक्षक हेमंत धांडे यांच्या पत्नी आहेत.