जळगाव । कोकमठाण, अहमदनगर येथील आत्मा मालिक शैक्षणिक संस्थेतर्फे आयोजित राज्य बालनाट्य स्पर्धेत विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै.श्रीमती ब.गो.शानभाग विद्यालयाच्या ‘मी मलाला’ या नाटकास सांघिक विशेष उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे. तसेच नाशिक येथील शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे आयोजित 39 व्या पुरोहित राज्य बालनाट्य स्पर्धेत विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै.श्रीमती ब.गो.शानभाग विद्यालयाच्या ‘मी मलाला’ या बालनाटकाला स्त्री अभिनयाचे पारितोषिक सिद्धी उपासनी या विद्यार्थिनीला देण्यात आले.
यांचा होता सहभाग
या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन योगेश पाटील तर संघव्यवस्थापक व प्रकाश योजना विद्यालयाचे शिक्षक मनोज पाटील आणि सुरेखा शिवरामे यांनी केले. यातील कलाकार सिद्धी पाटील, सिद्धी उपासनी, जान्हवी पाटील, कोटीज्या नेमाडे, फाल्गुनी महाशब्दे, अपूर्व कुलकर्णी, अनुजा मंजुळ, मृणाल पाटील, उत्कर्ष नेरकर, केतन भोळे, अभिजित जाधव, धनंजय पाटील व तनया नेवे आदींचा सहभाग होता. यशस्वी संघाचे अभिनंदन शालेय व्यवस्थापन मंडळ, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अंजली महाजन, उपमुख्याध्यापक जयंतराव टेंभरे, विभाग प्रमुख जगदीश चौधरी, राजेंद्र पाटील आणि शालेय परिवारातर्फे केले जात आहे.