राज्य महामंडळाच्या बसेसद्वारे शासकीय योजनांचा प्रचार

0

आचारसंहितेचा भंग ; यावलमधील राष्ट्रवादी तालुकाध्यक्षांची तक्रार

यावल- देशभरात सात तर राज्यात चार टप्प्यात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी 10 रोजी सायंकाळी पाच वाजेपासून आचारसंहिता जारी झाली असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत मात्र राज्य परीवहन महामंडळाच्या बसेसवर तसेच सार्वजनिक ठिकाणी व पेट्रोल पंपांवर राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार होण्याकामी शासकीय योजनांचे माहिती दर्शविणारे होर्डिंग व पोस्टर्स चिटकवण्यात आले आहेत. हा प्रकार म्हणजे आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार यावल तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकेश येवले यांनी निवडणूक विभागाकडे केली आहे. एस.टी. बसेससह पेट्रोल पंप व शहरातील सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले पोस्टर्स, होर्ग्डिंग्ज तसेच जाहिरात फलक तत्काळ काढण्याचे आदेश संबंधित विभागाला आदेश देऊन आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, अशी मागणी येवले यांनी केली आहे.