राज्य महामार्गाची खड्ड्यांमुळे झाली चाळण ; अपघातात वाढ

0

पिंपळनेर (दिलीप बोळे) । येथील राज्य महामार्गाची वाट लागली असून मोठ्या पुलालगतच्या रस्त्यावर, कन्या शाळेसमोर व सामोडे रस्त्यावरील सरकार हॉटेल समोरच्या रस्त्यावर मोठमोठ्या आकाराचे खड्डे पडले आहेत. खूपच धोकादायक रस्ता बनला असून खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नसल्यामुळे वाहनांचे नुकसान होते. लहान मोठे अपघात घडत असून यामुळे मोठ्या वाहनापासून धोका निर्माण होण्याची भीती आहे.

इतर राज्यात जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग
सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता यांनी संबंधित बीओटी तत्वावरील ठेकेदार व यंत्रणाकडे सूचना करायला हव्यात. येथील उपविभागीय बांधकाम विभागाने बनवलेल्या रस्त्यांच्या दशा यापेक्षा वेगळी नाही. विंचूर – प्रकाशात राज्य महामार्ग राज इन्फाट्रक्चर ग्रुपने बीओटी तत्वावर घेतला आहे. काही दिवसांपासून रस्त्यांची खूपच दूरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे तयार झाल्याने छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना घडतात. हा रस्ता महाराष्ट्र व इतर अनेक राज्यात जाण्यासाठी उपयुक्त आहे. गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, उ.प्र.या राज्यांना जोडणारा रस्ता आहे. गावाच्या मध्यभागातून हा राज्य महामार्ग जातो. धोकेदायक खड्डे बुजवण्याची मागणी वाहनचालक व नागरिकांनी केली आहे. लवकर खड्डे बुजले तर होणारे अपघात टाळता येऊ शकते. अनुराधा कॉलनीपर्यत रस्ता अतिशय खराब झाला आहे. जड वाहने ही याचा रस्त्यावरून मार्गक्रमण करतात तर वाळूची भरलेली अवजड डंपर ही याचा मार्गावरून जातात. वाळू भरलेल्य जड वाहनाच्या वाहतूकीमुळे रस्ता खराव होत असल्याचे नागरीकाचे म्हणणे आहे.