राज्य राखीव दलाचा एएसआय धुळे एसीबीच्या जाळ्यात

0

सरेंडर बिल मंजुरीसाठी स्वीकारली 500 रुपयांची लाच

धुळे- सरेंडर बिल मंजुरीसाठी 500 रुपयांची लाच मागणार्‍या धुळे राज्य राखीव दलातील एएसआय रणवीरसिंग राजपूत यास धुळे एसीबीच्या पथकाने गुरुवार, 7 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास साक्री रोड परीसरातील कार्यालयातून अटक केली. ही कारवाई धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश भोरटेकर व सहकार्‍यांनी केली. या कारवाईने लाचखोर अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. तक्रारदार हा राज्य राखीव दलातीलच कर्मचारी असून रजा रोखीकरण बिल (सरेंडर बिल) मंजूर करण्यासाठी आरोपी रणवीरसिंग राजपूत याने 500 रुपयांची मागणी केली होती मात्र तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर गुरूवारी आरोपीला लाच घेताना अटक करण्यात आली.