राज्य व जिल्हा सीमेवर धडकला कोरोना

0

शिरपूर। महाराष्ट्राच्या व खान्देशातील धुळे जिल्ह्याच्या सीमेपासून २५/३०किलोमीटर अंतरावर मध्यप्रदेशातील सेंधवा येथे कोरोनाच्या रुग्णाच्या संख्येत वाढत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ९ जणांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. या ९ जणांना पहिल्यापासूनच आइसोलेट करण्यात आले होते. याआधी तिन जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. आता या ९ जणांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आले आहेत.असे १२जण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहे. शिरपूर येथून फक्त ५० किमी अंतरावर सेंधवा शहर असल्याने अनेक गोष्टींचे कनेक्शन हे शिरपूर तालुक्याशी संबंधित आहे.मुंबई–राष्ट्रीय महामार्गावरील मध्यप्रदेश सिमेलगत असणाऱ्या सेंधवा शहरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने शिरपूरकरांनी देखील घरात राहून सुरक्षित राहणे गरजेचे आहे.