जळगाव। केंद्र शासनाने 29 डिसेंबर रोजी विविध परिवहन कामांसाठी शुल्क वाढ केली आहे. परिवहन शुल्कात दुप्पट तीप्पट वाढ करण्यात आली आहे. परिवहन शुल्कात केलेली दरवाढ ही अन्यायकारक असल्याने प्रवासी व मालवाहतुकदारांमध्ये याविषयी तीव्र संताप व्यक्त केली जात आहे. दरवाढीच्या निषेधार्थ महाराष्ट्रासह अनेक राज्यात चक्काबंदसह विविध आंदोलने झाली त्यांची अंशत: दखल घेऊन केंद्र सरकारने ही शुल्कवाढ पुर्वलक्षी प्रभावाने घेण्याऐवजी अधिसूचनेच्या दिनांकापासून घेण्याचा बदल केला. ही दरवाढ पुर्णतः मागे घेण्याची मागणी वाहतुकदारांनी केली आहे. ही शुल्कवाढ मागे घेण्याचे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीही केंद्र सरकारला केले आहे.
सुसूत्रता यावी
राज्याच्या परिवहन विभागाने 4 ऑगस्ट 2016 ला परिवहन विषयक विकास कामांसाठी परिवहन शुल्कात दोन ते तीन पटींनी वाढ केली आहे. केंद्राला वाढ मागे घ्या, असे आवाहन राज्यशासन करीत आहे. मात्र राज्याचे केलेली वाढ तशीच ठेवली कायम ठेवलेली आहे. ती त्वरीत मागे घ्यावी अशी मागणी वाहतुकदारांनी केले आहे. केंद्र शुल्कवाढ पुर्वलक्षी प्रभावाने घेतल नाही. त्याचप्रमाणे राज्याचेही शुल्क पुर्वलक्षी प्रभावाने घेऊ नये. केंद्र व राज्य शासनाच्या कार्यप्रणालीत समानता व सुसूत्रता असण्याची अपेक्षा वाहतुकदारांनी व्यक्त केली आहे.
प्रशासकीय कामाचा भुर्दंड
परिवहन विभागाचे कामकाज संगणकीकृत करण्यात आले आहे. संगणक प्रणालीत बिघाड, नेटवर्कची समस्या आदी वेगवेगळी कारणे नेहमीच येत असतात. त्यामुळे कागदपत्र मिळण्यास उशीर होतो. वाहनचालकांकडून पनवान्यासाठी अर्ज केल्यानंतर वेळेत कागदपत्रे मिळत नसल्याने वाहतुक करतांना अडचण येते. वाहन चालकाला उशिराच्या प्रत्येक दिवसाला दंड केला जातो प्रशासकीय कामांसाठी झालेला व होत असलेला उशिराचा दंड दरमहा 200 रुपयाचे दंड रिक्षाचालकांनी का भरायचा? याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
यांची होती उपस्थिती
निवेदन देतेवेळी मुकूंद सपकाळे, रज्जाक खान, मुकेश बेदमुथा, चंदू शर्मा, राजु करे, नंदू पाटील, विलास ठाकुर, भरत वाघ, मुन्नाभाई, राधेश्याम व्यास, भानुदास गायकवाड, शांताराम आहिरे, पोपट ढोबळे, प्रल्हाद सोनवणे, राजेंद्र पाटील, गौतम सपकाळे, अनिस खास, रविंद्र मराठे, शशीकांत जाधव, विनोद कुमावत, संजय पाटील, कन्हैय्या शेठ, गोपाल सपकाळे, प्रकाश पाटील, सुभाष पाटील, राजु पाटील, कैलास विसपुते, किरण मराठे, अनिल शिंपी, संभाजी पाटील आदि रिक्षाचालक उपस्थित होते.