पिंपरी : महापालिकेच्या विकास कामांच्या उद्घाटनासाठी शहरात येऊनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण, रिंग रोड, अनधिकृत बांधकामे या प्रश्नावर चक्कार शब्द उच्चारला नाही, मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचा चिंचवड ब्लॉक काँग्रेस कमिटीने निषेध केला आहे. कर्जमाफीचे आश्वासन देऊन सरकारने शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मराठा मोर्चाचे गांभीर्य न ठेवता आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेतला नाही. अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठीचे आश्वासन लक्षात न ठेवता सरकारने नागरिकांना गृहीत धरले आहे. शास्ती कराचा प्रश्न सोडविला नाही. शहरातील रिंग रोडच्या प्रश्नावर काहीतरी मार्ग सूचवतील, अशी अपेक्षाही फोल ठरली असल्याने पत्रकात म्हटले आहे.