मुंबई : राज्य सरकारने हुक्का पार्लर बंदी लागू केली आहे. याबाबतची अधिसूचना गृहविभागाने जारी केली असून सिगरेट आणि तंबाखू उत्पादनसंबंधी अधिनियम २००३ कायद्याचे उल्लंघन केल्यास एक लाख रुपये दंड आणि ३ वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.
महाराष्ट्र हे हुक्का पार्लर बंदी लागू करणारं दुसरं राज्य आहे. याआधी गुजरातने हुक्का पार्लर बंदी लागू केली आहे. डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या नागपूर अधिवेशनात आमदार मंगलप्रभात लोढा यांनी विधीमंडळात हुक्का पार्लर बंदी विधेयकाचा प्रस्ताव मांडला. यावर्षी एप्रिलमध्ये हे विधेयक विधीमंडळात पारित झालं. राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकारने ही अधिसूचना जारी केली आहे. लोअर परळ येथे कमला मिलमध्ये डिसेंबर २०१७ मध्ये हुक्का पार्लरमुळे आग लागून १४ लोकांचा बळी गेला होता. त्यानंतर ही बंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला