राज्य सरकारने शेतीविषयक चांगली धोरणे आखावीत

0

इंदापूर । माजी केंद्रीय कृृषिमंत्री शरद पवार सत्तेत असताना त्यांनी देशातील शेतकर्‍यांच्या कृृषी विषयक धोरणावीषयी चांगले निर्णय घेतल्यानेच त्या काळात शेतकर्‍यांना 71 कोटी रूपये कर्जमाफी कोणतीही कागदपत्र सादर न करता मिळवून देवून पवार सदैव शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहीले. तर सध्याचे सरकार शेतकर्‍यांच्या कर्जमाफीविषयी शेतकर्‍यांची दिशाभूल करत असून कर्जमाफीच्या नावाखाली शेतकर्‍यांना भरमसाठ कागदपत्रांची मागणी करून हेलपाटे मारायला लावणारे फसवे सरकार आहे. भविष्यात या सरकारने शेतकर्‍यांच्या शेती धोरणाविषयी चांगले निर्णय घेण्याची मागणी आमदार दत्तात्रय भरणे यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर आयोजित शरद कृषि महोत्सव2018 पशु प्रदर्शन व घोडे बाजार उद्घाटन प्रसंगी शिवलिलानगर डाळिंब मार्केट अकलुज रोड, इंदापुर येथे केली.

इंदापूरला घोडे बाजार भरविण्याचा पहिला मान
या कार्यक्रमाचे उदघाटन शरयू फांउडेंशन अध्यक्षा शर्मिलाताई पवार, श्रीनिवास पवार, आमदार दत्तात्रय भरणे, माळीनगर सह. साखर कारखाना एम. डी. रंजनभाऊ गीरमे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप गारटकर, जि. प. बांधकाम सभापती प्रविणभैय्या माने यांच्याहस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी आमदार भरणे बोलत होते. शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कृृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी इंदापूर तालुक्यात घोडे बाजार भरविण्याचा पहिला मान मिळविला असून अप्पासाहेब जगदाळे यांचे कार्य खरोखर वाखाणण्यासारखे असल्याचे ते म्हणाले.

जि.प.कडून 5 लाखांचा निधी
अध्यक्षीय भाषणात जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते म्हणाले, की जि. प. वतीने या कृृषी पशु प्रदर्शन व घोडे बाजारास तीन लाख रूपयांचा निधी देण्याचे ठरले होते. परंतु जि. प. बांधकाम सभापती प्रविण माने यांच्या आग्रहा खातर पाच लाख रुपयांचा निधी आम्ही जिल्हा परीषदेच्या माध्यमातून देत आहोत. मागे 50 टक्के अनुदान देवून शेतकर्‍यांना शेतीविषयक अवजारे जि. प. माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येत होती. परंतु या वर्षी आम्ही शेतकर्‍यांच्या हिताचा निर्णय घेवून पन्नास टक्के अणुदान रद्द करून ते 75 टक्के इतके केल्याने शेतकर्‍यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

घोडे बाजारालाा चांगला प्रतिसाद
घोडे बाजारात 450 च्या वर घोडे देशाच्या विविध राज्यातून दाखल झाले असून घोडे बाजारातील घोड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली असल्याचे अप्पासाहेब जगदाळे यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणात सांगितले. या वेळी नारायण आबा पाटील, प्रदिप गारटकर, प्रविण माने यांची भाषणे झाली. या कार्यक्रमास जेष्ठ नेते ज. मा. मोरे, प्रताप पाटील, माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ, गणेश झगडे, रोहित मोहळकर, महारूद्र पाटील, मधुकर भरणे, अशोक चोरमले, छगनराव भोंगळे, आमोल भिसे, घोड्याचे प्रसिद्ध व्यापारी रणजित पवार, रहेनाताई मुलाणी, सुनिल खैरनार इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.