राज्य सरकारला विकासापेक्षा बदल्यांमध्ये अधिक रस; फडणवीसांचे घणाघाती

0

मुंबई: राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिक मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. राज्य सरकारच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. राज्यात सरकार अस्तित्वातच नाही अशी परीस्थिती आहे. राज्याच्या विकासात भरीव कामगिरी करण्यापेक्षा राज्य सरकारला कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या बदलीमध्येच अधिक रस असल्याचे घणाघाती आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आज पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरु असतांना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला चांगलेच लक्ष केले.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने यावर्षी बदल्या नाही केल्या असत्या तरी चालले असते, मात्र सरकारने सर्व कामे सोडून बदलीचे कामे अगोदर केली.

वाढीव वीजबिलामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत. बिल कमी करण्याची मागणी होत आहे, मात्र यावर राज्य सरकार काहीच निर्णय घेत नाही. सामान्य नागरिकच नाही तर सेलिब्रिटी देखील वाढीव वीजबिलामुळे त्रस्त आहेत. सामान्य नागरिकांची व्यथा सरकार ऐकत नाही किमान सेलिब्रिटीची व्यथा तरी सरकारने ऐकाव्यात असे आवाहन देखील फडणवीस यांनी केले.