राज्य सरकार ,पानसरे कुटुंबीयाची हायकोर्टात

0

मुंबई – ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी समीर गायकवाडच्या जामिनाविरोधात राज्य सरकार आणि पानसरे कुटुंबीयांनी दाखल केलेल्या याचिकेची उच्च न्यायालयाने आज दखल घेतली. न्यायमूर्ती रेवती मोहिते – ढेर यांनी प्रतिवादी समीर गायकवाड याला नोटीस बजावण्याचे निर्देश देऊन याचिकेची सुनावणी तीन आठवडे तहकूब ठेवली.

दिड वर्षापूर्वी सप्टेबर 2015 मध्ये पानसरे हत्ये प्रकरणी समिर गायकवाड यांला विषेश पथकाने अटक केली होती. त्यांनतर त्यांने कनिष्ठ तसेच उच्च न्यायालयात धाव घेऊन जामीन मिळावा म्हणून अनेक वेळा प्रयत्न केले . मात्र त्यावेही न्यायालयाने त्याचे जामीन अर्ज फेटाळून लावले होत. अखेर गेल्याच महिन्यात 17 जून रोजी कनिष्ट न्यायालयाने समीर गायकवाड 25 हजाराचा सशर्त जामीन मंजूर केला. पानसरे कुटूबियांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. समिर विरोधात खुनाचा अजामीन पात्र गुन्हा दाखल असल्याने जामीन देण्यात येवू नये अशी विनंती करण्यात आली आहे.