मुंबई। आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपविजयी ठरलेल्या भारतीय महिला संघावर चहुबांजनी कौतुक आणि रोख पुरस्कारांचा वर्षाव होत आहे. गुुरुवारी बीसीसीआयने संघातील खेळाडूंना प्रत्येकी 50 लाख रुपयांचे आणि प्रत्येक सहयोगी स्टाफला 25 लाख रुपयांचा पुरस्कार दिला. आता महाराष्ट्र सरकारनेही या संघात असलेल्या राज्यातील खेळाडूंना सन्मानीत करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघातील पूनम राऊत, स्मृती मंधाना आणि मोना मेश्राम यांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचा रोख पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात केली.
पूनमची खेळी व्यर्थ
पूनमने अंतिम लढतीत जिगरी फलंदाजी करत संघाला विजयाची आस दाखवली होती. संघातील इतर फलंदाजांकडून अपेक्शित साथ न मिळाल्यामुळे पूनमची सामन्यातली 86 धावांची खेळी वाया गेली. पूनम विश्वचषक स्पर्धेतीन नऊ सामन्यांमधून एका शतकासह 381 धावा केल्या होत्या. विश्वचषक फलंदाजीतील या पाचव्या क्रमांकाच्या धावा आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या करो या मरो सामन्यात पूनमने 106 धावांची शतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. स्मृती मंधानाने वेस्टइंडिजविरुद्धच्या सामन्यात नाबाद 106 धावा करत संघाला सोपा विजय मिळवून दिला होता. मोनानेही अष्टपैलू खेळ करत छाप पाडली होती.