राज करंडक टी ट्वेन्टी स्पर्धेत दांडेकर कॉलेज संघ विजेता

0
स्पार्टन क्रिकेट असोसिएशन मावळ संघ उपविजेता 
लोणावळा : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, लोणावळा शहर यांच्या वतीने आयोजित राज करंडक टी ट्वेन्टी स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत दांडेकर कॉलेज पालघर संघाने विजेतेपद पटकाविले. तर, स्पार्टन क्रिकेट असोसिएशन मावळ संघ उपविजेता ठरला. दि. 02 ते 17 जानेवारी या दरम्यान घेण्यात आलेल्या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी झाले होते. ही स्पर्धा रेल्वे मैदान, लोणावळा येथे खेळविण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन मनसे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, नगरसेवक किशोर भेगडे, मनविसे तालुकाध्यक्ष अशोक कुटे यांच्या हस्ते करण्यात आले.
दोन विभागात झाली स्पर्धा…
क्रिकेट स्पर्धा महाविद्यालय तसेच तालुक्या अंतर्गत अशा दोन विभागात घेण्यात आली. मनविसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत कनोजिया, पंकज गदिया, संतोष मुर्हे, नगरसेवक निखिल कविश्‍वर, अशोक कुटे, दिपक जैन, संगीता गुजर, सुशील पायगुडे, सचिन पवार आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. मनविसे शहराध्यक्ष अक्षय जाचक, विजय भानुसघरे, अविनाश जांभुळकर, रामदास शेडगे, सागर शेरेकर, संतोष खराडे, रवी कालेकर यांनी स्पर्धेचे संयोजन केले. यासाठी मास्टर क्रिकेट असोसिएशन प्रा.लि चे अभिजीत कदम, अलंकार कारके यांचे विशेष सहकार्य लाभले.