राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरे आणि सरकारचे तोंडभरून कौतुक

0

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाबाबत सरकार करत असलेल्या उपाययोजनांचे कौतुक करत सगळ्यांनी सरकारला तसेच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. काल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून मला निदर्शनास आलेल्या काही गोष्टींची अंमलबजावणी करण्याबाबत सूचना केल्या असून त्यांनी सकारात्मकता दर्शविली असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारचे अभिनंदन केले.

काही मुठभर लोकांना गांभीर्य नसल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे जीव धोक्यात आहे. मुठभर लोकांनी गांभीर्याने ही गोष्ट घेतली नाही तर त्यावर कठोर पाऊले सरकारने उचलायला हवी असे देखील त्यांनी सांगितले. हातावर पोट असलेल्यांनी थोडी कळ सोसावी, कारण परिस्थिती ओढवली आहे, ती पूर्ववत होईल. आरोग्य यंत्रणेचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहे, आरोग्य यंत्रणेचे आणि पोलीस यंत्रणेचे उपकार मोठे असल्याचे जाणीवही राज ठाकरे यांनी करून दिली.