राज ठाकरेंच्या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही: उद्धव ठाकरे

0

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ‘कोहिनूर’ प्रकरणी ईडीकडून नोटीस मिळाली आहे. उद्या २२ रोजी त्यांची चौकशी होणार आहे. दरम्यान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी राज ठाकरे यांची पाठराखण केली आहे. ईडीच्या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मात्र दोन दिवस थांबून संबंधित प्रकरणावरील निकालाची वाट बघितले पाहिजे असे त्यांनी सांगितले. माध्यमांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.