मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोहिनूर स्क्वेअरच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी आज ईडीकडून चौकशी सुरु आहे. सकाळपासून त्यांची चौकशी सुरु आहे. दरम्यान आता दुपारी चौकशीनंतर थोडीसी विश्रांती घेण्यात आली आहे. पुन्हा चौकशी सुरु होणार आहे. संध्याकाळपर्यंत चौकशी चालणार आहे, आवश्यक असेल तर उद्या देखील चौकशी होऊ शकते.
राज ठाकरे चौकशीला गेले असतांना त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय देखील आहे. ईडीच्या कार्यालयाजवळील एका हॉटेलमध्ये राज ठाकरे यांचे कुटुंबीय थांबून आहेत. दरम्यान चौकशीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत चार ठिकाणी जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे.