राज ठाकरेंच्या मुलाचा आज शाही विवाह !

0

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचे आज २७ जानेवारी रोजी लग्न संपन्न होत आहे. मिताली बोरुडे या मैत्रिणीशी अमित ठाकरे विवाहबद्ध होत आहे. या विवाह सोहळ्याला राजकीय नेत्यांसह, उद्योग, चित्रपट तसेच इतर क्षेत्रातील मान्यवर हजर राहणार आहेत. लोअर परळ येथील येथील सेंट रेजिस या हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

आता थोड्याच १२ वाजून ५१ मिनिटांनी अमित आणि मिताली विवाहबद्ध होत आहेत. कृष्णकुंज आणि इतर परिसराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. शनिवारी संध्याकाळी राज ठाकरे यांचे निवासस्थान कृष्णकुंज येथे नातेवाईकांच्या उपस्थितीत हळदीचा कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अशोक चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, नितीन गडकरी, आशिष शेलार, प्रसाद लाड यांची उपस्थिती असणार आहे. तसेच अंबानी परिवार आणि रतन टाटा हे देखील उपस्थित राहणार आहेत. मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांसह बॉलिवूडमधील कलाकारही या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.