नवी दिल्ली-मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे भाजपवर सातत्याने टीका करीत असतात. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले असता त्यांनी, राज ठाकरे माझे चांगले मित्र आहेत मात्र त्यांची राजकीय वक्तव्ये आणि व्यंगचित्रे गांभीर्याने घेण्याची गरज नाही. तुम्ही देखी त्यांना गांभीर्याने घेऊ नका असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. पाच राज्यांचे निकाल आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधन नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधत पप्पू आता परमपूज्य झाला असे म्हटले होते. या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खास शैलीतून उत्तर दिले आहे.
पाच राज्यांमधल्या निवडणुकांमधून जनतेने चांगला पायंडा पाडला आहे. इतके दिवस भाजपाचे नेते राहुल गांधींना पप्पू म्हणून हिणवत होते. मात्र राहुल गांधी आता परमपूज्य झाले आहेत असे राज ठाकरेंनी म्हटले होते. त्याच टीकेला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत राज ठाकरेंना गांभीर्याने घेऊ नका असे म्हटले आहे. राज ठाकरेंकडे फक्त आपली मतं मांडतात, त्यांच्याकडे बाकी काही काम नाही. त्यामुळे त्यांना कोणीही गांभीर्याने घेऊ नका असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.