राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाहीः शरद पवारांचे विधान

0

मुंबईः राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मनसेने देखील आपली भूमिका काहीशी बदलविली आहे. मनसेने आता हिंदूत्वाची भूमिका घेतली आहे. 23 जानेवारीला मनसेने नवीन ध्वजाचे अनावरण करुन सीएए आणि एनआरसी कायद्याला समर्थन दिले आहे. दरम्यान शरद पवार यांनी राज ठाकरेंबाबत विधान केले आहे. राज ठाकरे यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही अशा शब्दात शरद पवारांची राज ठाकरेंना टोला लगावला आहे. काही माणसे फक्त भाषण ऐकायला येत असतात. मनसेच्या सभांना असणार्‍या गर्दीचे मतात रुपांतर होत नसते असेही शरद पवारांनी सांगितले. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दिल्ली विधानसभा निवडणुकीवर त्यांनी भाष्य केले. दिल्ली भाजपच्या अहंकारी वृत्तीचा पराभव झाला असून भाजपच्या पराभवाला सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीचा निकाल आश्‍चर्यकारक नाही, आपचे सरकार येणार हे सुरुवातीपासूनच निश्‍चित होते असेही विधान त्यांनी केले आहे.

महाविकास आघाडीचे सरकार येण्यापूर्वी शरद पवार आणि राज ठाकरे यांची जवळीक होती. एकमेकांवर टीका करणे त्यांनी बंद केले होते. त्यामुळे अनेकदा राज ठाकरेंवर टीका देखील झाली. आता देखील राज ठाकरे शरद पवारांवर टीका करत नाहीत. मात्र शरद पवारांनी राज ठाकरेंना लक्ष केले आहे.