सोलापूर : काल सोलापूरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेतली. यासभेत राज ठाकरे यांनी भाजपाच्या तथाकथित डिजिटल गावाचे खरे रुप जनते समोर आणले. भाजपने महाराष्ट्रातील पहिल्या डिजीटल गावची खरी अवस्था काय आहे, हे चित्ररुपात जनतेसमोर मांडले. त्यानंतर सरकारला खडबडून जाग आली आहे. हरिसाल गावातील जे तांत्रिक मुद्दे असतील, ते सोडवू असे आश्वासन शिक्षमंत्री विनोद तावडेंनी दिले आहे. राज ठाकरेंच्या या पोलखोल सभेनंतर भाजपा नेते शिक्षणमंंत्री विनोद तावडेंनी सराकरतर्फे आश्वासन दिले आहे.
भाजपाने अमरावती जिल्ह्यातील हरिसाल गावाला डिजीटल गाव घोषीत करुन त्यांची जाहिरात केली होती. त्यामध्ये हरिसाल गाव डिजिटल झाल्याचे चित्र दाखवण्यात आले होते. मात्र हरिसाल गावातली खरी परिस्थिती वेगळीच असल्याचे राज ठाकरे यांनी लक्षात आणून दिले. हरिसाल गावातल्या ज्या तरुणाला जाहीरातीत वापरण्यात आले आहे, त्याला राज ठाकरे यांनी मंचावर आणले. हरिसाल गावाच्या जाहिरातीत दिसलेला हा तरुण सध्या सगळीकडे नोकरीसाठी भटकत आहे ही वास्तव परिस्थिती राज ठाकरेंनी दाखविली.