मुंबई: लोकसभा निवडणूक सुरु आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले असून येत्या २९ तारखेला चौथ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे भाजपच्या विरोधात राज्यभरात प्रचारसभा घेत आहे. मनसेच्या प्रचार सभेत राज ठाकरे मोदी आज भाजप नेत्यांचे व्हिडियो दाखवत आरोप करत आहे. दरम्यान भाजपने देखील राज ठाकरेंच्या व्हिडियो स्टाईल टीकेला व्हिडियोच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. वांद्रयाच्या रंगशारदा सभागृहात भाजपाची सभा सुरु आहे. या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजपाकडून त्यांच्याच स्टाईलमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. मनसेच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ला भाजपाकडून ‘बघाच तो व्हिडिओ’च्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले जात आहे.
राज ठाकरे यापूर्वी राहुल गांधी, अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्याबद्दल काय बोललो होते. त्यांच्यावर कशी टीका केली होती. ते राज ठाकरे यांचे जुने व्हिडिओ दाखवले. राज ठाकरेंच्या ३२ प्रकरणांचा आढावा घेण्याची आमची तयारी पण वेळेअभावी १९ प्रकरण दाखवणार असे मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले. असत्य आणि अर्धवट गोष्टींवर राजकारण करण्याची राज ठाकरें तुमची प्रवृती आहे. खोटं बोलं, रेटून बोलं म्हणजे राज ठाकरे अशी टीका आशिष शेलार यांनी केली. आशिष शेलार हे राज ठाकरेंचे जवळचे मित्र आहेत. त्यांनी भाषणामध्ये ‘मित्रा तू खरचं चुकलास’ असे उदगार काढले.